बॉम्बेचं मुंबई झालं मग औरंगाबादचं संभाजीनगर का नाही ? उदयन राजे म्हणतात राजेशाही असती तर…

69

मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भावनिक राजकारण खेळते असा आरोप विरोधकांनी केला होता.
या नामांतराच्या मुद्द्यावर नेते प्रतिक्रिया देत आहेत.

आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बॉम्बेचं मुंबई झालं मग औरंगाबादचं संभाजीनगर का नाही ? राजेशाही असती तर माझं मत व्यक्त केलं असतं’, असं भाष्य त्यांनी केलं आहे.

साताऱ्यातील पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटरचे काम पूर्ण झाले होते मात्र, उदघाटन रखडल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. हे समजल्याने उदयनराजेंनी पाहणी करून अचानक छत्रपती संभाजी महाराज असं नाव असलेल्या या ग्रेडसेप्रेटरचं उदघाटन करून हा मार्ग खुला करून दिला