मुलगा की मुलगी ? करीना कपूरचं हे आहे उत्तर…

4

करीना कपूर दुसऱ्यांदा आई होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ही खुशखबर आपल्या चाहत्यांना सांगितली होती. करीना सध्या गरोदरपणातील काळ एन्जॉय करत आहे. विशेष म्हणजे या काळातही ती तिच्या फॅशन सेन्सकडे लक्ष देत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अनेकदा करीना कपूरची चर्चा होताना पाहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर करीनाची एक मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीत, मला मुलगी हवी आहे, असं करीना म्हणत असल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असलेली करीनाची ही मुलाखत जुनी आहे. २०१६ मध्ये तिने ही मुलाखत दिली होती. तैमुरच्या वेळी गरोदर असताना करीनाने या मुलाखतीत मला मुलगी हवी असं म्हटलं होतं. तुला मुलगा हवा की मुलगी? असा प्रश्न करीनाला विचारण्यात आला, त्यावर मुलगा असो किंवा मुलगी त्याने काय फरक पडणार आहे? मी मुलगी आहे त्यामुळे मला मुलगीच झालेली जास्त आवडेल. मी माझ्या आई-वडिलांसाठी एखाद्या मुलापेक्षा कमी नाही, असं करीना म्हणाली होती.