#boycottamazon चा ट्रेंड; देवी-देवतांची चित्रे असलेले अंतरव्रस्त्र, पायपुसण्यांची विक्री

6

सध्या सणासुधीचा कालावधी सुरू आहे. सर्व ऑनलाईन शॉपिंग ऍप वर धमाकेदार ऑफर सुरू आहेत. अशातच नामवंत ऑनलाईन सेवा देणारी कंपणी अमेझॉन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अमेझॉनद्वारे विकल्या जाणारी अंतवस्त्रे आणि पायपुसण्या यावर देवी-देवतांची चित्र असल्याचे आढळून आले आहे. हिंदू देवतांची प्रिंट असलेले कपडे विक्रीला असल्यामुळे सोशल मिडियावर काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी याबाबत संतापदेखील व्यक्त केला आहे.

अशा प्रकारची विक्री करणाऱ्या अमेझॉनला टॅग करून नेटकऱ्यांनी Boycott Amazon हा हॅशटॅग ट्रेंड सूरु केला आहे. या वस्तूंवर तातडीने बंदी यावी अशी मागणी युजर्सनी केली आहे. महत्वाचे म्हणजे ही विक्री भारतात करण्यात येत नसुन प्रदेशांमध्ये या वस्तू विकल्या जात आहेत. याआधीही हिंदू देवतांची चित्रे असलेले चप्पल, बुट विकल्याचे प्रकार घडले होते. यावेळीही भारताने विरोध केला होता. यामध्ये हाफ पॅन्टपासून ते अंडर गारमेंटपर्यंत देवतांच्या चित्राचा वापर केला आहे. यामुळे परदेशातील अनेक लोकांनी अमेझॉन विरोधात मोहीम उघडली आहे. आणि हे ऍप अनइस्टॉल करायला सांगितले आहे. या वस्तूंची विक्री बंद करून तातडीने त्या वस्तू हटवण्याची मागणी केली आहे.

हा सगळा प्रकार घडला तेव्हा आमच्या माध्यमातून अशा प्रकारची उत्पादने विकली जाणार नाहीत. आम्ही याची दक्षता घेऊ असे अमेझॉन कंपनीने स्पष्ट केला होता. पंरतु आता पुन्हा एकदा ही कंपनी वादात अडकली आहे. पुन्हा एकदा अशा प्रकारची कपडे विकताना दिसत आहे. त्यामुळे कंपनीवर संताप व्यक्त करत #boycott amazon हा हॅशटॅग वापरत सगळीकडे निषेध करत आहेत.