नाशिकचे माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्री वर आज सायंकाळी ५ वाजता प्रवेश करणार आहे.
भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर नाशिक दौऱ्यावर येणार आहेत, त्यापूर्वीच भाजपला धक्का बसला आहे. सुनील बागुल आणि वसंत गीते दोनही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. आता त्यांची घरवापसी होणार आहे.
काल रात्री वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी नाशिक मध्ये खासदार संजय राऊत यांनी दोन तास प्रवेशा संदर्भात चर्चा केली. त्यांच्या प्रवेशाची आज संजय राऊत पत्रकार परिषदेत घोषणा करणार असल्याची अशी माहिती आहे.