मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आलेले संकट टळले असं वाटतं असतानाच, मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यात १४ वर्षाची मुलगी असून ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत म्हटलं आहे. सोबतच पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे. सदरील वृत्त लोकमतने दिले आहे.
मला माझ्या मुलांना भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बँगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही.
मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे घडल्यास त्याला धनंजय मुंडे जबाबदार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही. तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहे. असे करुणा शर्मा यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.