औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस अधिक कोरोना रुग्णसंख्या निघत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात ३० मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीसाठी हा लॉकडाऊन असेल. लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने, दूध, भाजी दुपारी १२ पर्यंतच घेता येईल. अन्य वेळेत पूर्णतः टाळेबंदी असणारा आहे.
औरंगाबाद शहरात संसर्ग जलद गतीने पसरत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या अफवा उडालेल्या होत्या. काल जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी देखील लॉकडाऊनचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आज (दि.२७) औरंगाबाद शहरात पूर्णतः लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
शहरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या काळात वाहने, जलतरण तलाव, जिम, हॉटेल्स पूर्णपणे बंद असतील. सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादी कार्यक्रमांवर पूर्णतः बंदी असणार आहे.
सदरील टाळेबंदी मध्ये खाजगी, सरकारी वैद्यकीय सेवा पूर्णपणे सुरु असतील. या काळात दुकानदार, विक्रेते, दूध, भाजीपाला विक्रेते यांना दुपारी १२ पर्यंत विक्रीसाठी परवानगी असेल. असे जाहीर करण्यात आले आहे.