राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप करून गुन्हा दाखल केलेली तरुणी नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे. आरोपीला अटक करत नाही तोवर पोलिसांनी घरी येऊ नये, असा पवित्रा तरुणीने घेतला होता.
काय आहे नेमकं प्रकरण : औरंगाबाद येथे मेहबूब इब्राहिम शेख नावाच्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. औरंगाबाद शहरातील अल्पसंख्याक तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. तरुणीने तक्रारीत म्हटले होते की, 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला. तरुणीने याबाबत औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर महेबुब शेख यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली होती. महेबूब शेख यांच्याबाबत औरंगाबादेत तक्रार दाखल झाल्यानंतर लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी महेबुब शेख यांनी संपर्क केला होता. तसेच आपण सर्वप्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत असे कळविले होते. काही तथ्य आढळल्यास मला शिक्षा करा. अशी विनंती तपास अधिकाऱ्यांकडे केल्याचे शेख यांनी सांगितले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब झाली आहे. ही तरुणी नॉट रिचेबल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे. आरोपीला अटक करत नाही तोवर पोलिसांनी घरी येऊ नये, असा पवित्रा तरुणीने घेतला होता. सदरील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.