जगभरात ब्रेस्ट कॅन्सर चे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात महिला ब्रेस्ट कॅन्सर ला सामोऱ्या जात आहेत. महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग हा सर्वात जास्त होणारा कॅन्सर म्हणून सध्या ओळखला जात आहे. मात्र, त्याचे वेळेवर निदान झाल्यास आणि त्यावर वेळेवर उपचार घेतल्यास स्तनांच्या कर्करोगावर मात करणं शक्य असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. ग्रामीण महिलांपेक्षा शहरी महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर चे प्रमाण अधिक आहे. पाश्चात्य देशांमधील महिलांमध्ये ७ महिलांमध्ये १ महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होत असल्याचं साध्य निरीक्षण आहे. तर भारतात शहरी भागातील २० महीलांपैकी १ महिलेला व ग्रामीण भागातील ५० पैकी १ महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होत असल्याचं निदर्शनात येते.
सध्या भारतात स्तन कर्करोग झपाट्याने वाढत आहे. सध्या महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरमध्ये ब्रेस्ट कॅन्सर पहिल्या क्रमांकावर आहे.
अशी घ्या काळजी…
१) ब्रेस्ट मध्ये असलेली गाठ डॉक्टरकडून तपासून घ्या.
२) प्रत्येक महीलेने प्रत्येक महिन्यात स्वापरिक्षण करावे.
३) स्तनांचा बदल डॉक्टरांच्या निदर्शनास आणुन द्यावा.
४) गरज पडल्यास तत्काळ उपचार घ्या.