भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 36 ब्रिटिश खासदारांनी पाठिंबा दिला आहे. ब्रिटनमधील लेबर पार्टीचे खासदार तन मन जितसिंग धेसी यांच्या नेतृत्वात 36 ब्रिटिश खासदारांनी सचिव डोबीनिक राब यांना पत्र लिहिलं आहे.
या पत्रात कृषी कायद्याविरोधात भारतावर दबाव आणण्याची मागणी करण्यात आली आहे. खासदारांच्या गटाने म्हटलं आहे की, पंजाबच्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भारत सरकारशी चर्चा करावी.
खासदार सिंग म्हणाले, “गेल्या महिन्यात अनेक खासदारांनी लंडनमधील भारतीय उच्चायोगाला भारतातील शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या तीन कृषी कायद्यांबाबत पत्र लिहिलं होतं. केंद्र सरकारने करोनाच्या काळात आणलेले हे तीन कृषी कायदे शेतकऱ्यांचे शोषण थांबवणे आणि त्यांच्या पीकांना योग्य मोबदला देण्यास अपयशी ठरल्याबद्दल देशभरात व्यापक स्वरुपात शेतकरी निषेध आंदोलन करत आहेत.
ब्रिटनमधील खासदारांनी भारतातील शेतकरी विरोधी कायद्याबाबत आवाज उठवला आहे. त्याला भारत सरकार कितपत सकारात्मक घेईल ते येणाऱ्या काळात दिसून येईल.