बहिणीसाठी भावाचं झुरतया काळीज गं : ‘होणाऱ्या त्रासाची मला जाणीव, मोठा भाऊ म्हणून सोबत आहे; काळजी घ्या ताई’

173

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती मिळताच त्यांचे बंधू धनंजय मुंडे काळजीत पडले आहेत. राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचे आवाहन केले केलं आहे.

“प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मध्यामावर शेअर केली आहे.

“पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई.” अशी फेसबुक पोस्ट करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला कोरोनची लागण झाली असून,मी गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाची लागण झाली असेल. त्यामुळे या काळात जे माझ्या संपर्कात आले, त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी.असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.