गगनयान हा भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. गगनयानाच्या उड्डाणासाठी लागणारे बूस्टर पुण्यातील वालचंदनगर कंपनीत तयार झाले आहे. हा इस्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून इस्त्रो पहिल्यांदाच अवकाशात अंतराळवीरांना पाठविणार आहे. इस्त्रोणार्फत 2022 ला ‘गगनयान’ उपग्रह अवकाशात पाठविण्यात येणार आहे.
गगनयान ही भारताची पहिली मानवरहित अंतराळ मोहीम आहे. 2020 मध्ये ही मोहीम राबविली जाणार होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गगनयानाचे प्रक्षेपण थांबले गेले. असे असले तरी या मोहिमेचे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केले आहे. मुख्य यानाबरोबर हे यान अंतराळात पाठवण्यासाठी जीएसएलव्ही मार्क 3 या भारताच्या बाहुबली प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे.
गगनयान अवकाशात पाठविण्यासाठी जी ताकद लागते. ती ताकद निर्माण करण्याचं काम बुस्टर करतो. हे तयार झालं असून त्यांची गुणवत्ता चाचणीही झाली आहे. विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे निदेशक एस. सोमनाथ तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने या प्रकल्पाचे उद्घाटन १८ डिसेंबरला कंपनीच्या आवारात होणार आहे.
अंतराळ मोहीमांच्या प्रक्षेपणा दरम्यान एखादा अपघात झाल्यास अंतराळ वीरांचे जीव वाचवण्यासाटी क्रूय एस्केप प्रणालिही कंपनीत तयार केली आहे. याशिवाय वालचंदनगर इंडस्ट्री येत्या काळात १८ प्रकारच्या मिसाईल साठी लागणारी सामग्री बनवणार आहे.