Anchor : भाजपच्या वतीनं आज राज्यभरात महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात येतं आहे. बारामती शहरातील भिगवण चौकात हे आंदोलन करण्यात आलं आहे .
बारामतीत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांचा निषेध करण्यात येत आहे.
यावेळी भाजपाच्या वतीने खंडणीखोर महाविकास आघाडीचा निषेध असो, अनिल देशमुख मुर्दाबाद, राष्ट्रपती राजवट लागू करा अशा घोषणा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या आहेत.बारामती शहर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.