परंतु २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब आहे ? : नवाब मलिकांची खोचक टीका

6

आज देशात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली.जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे,” अशी मागणीही नवाब मलिक यांनी यापूर्वी केली होती. 

यावरून माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगलं झालं असतं असे देशाचे प्रधानसेवक २०१५ मध्ये सांगत होते परंतु २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब आहे?, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. 

देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं १०० रूपयांचा टप्पा पार केला आहे यावरून नबाव मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.इंधन दरवाढीचा धागा पकडत नवाब मलिक यांनी मोदींना २०१५ मधील त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देताना आता पेट्रोलने शंभरी गाठली मग हे नशीब कुणाचे अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.