पण, त्यांचा हा डाव उधळवून लावू : रणजितसिंह नाईक निंबाळकर 

97

इंदापूरासाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा; अन्यथा सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही खासदार निंबाळकरांनी दिला. 

नीरा देवघर धरणाबरोबरच आता उजनीचं पाणी चोरण्याचा डाव बारामती आणि इंदापूरकरांनी आखला आहे. पण, त्यांचा हा डाव उधळवून लावू, असा इशारा माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी (ता. २७ एप्रिल) ‘सरकारनामा’शी बोलताना दिला.

उजनीतून इंदापूरला पाणी देण्यावरुन सरकार विरुध्द शेतकरी असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विविध शेतकरी संघटनांबरोबरच आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे.

भक्कम साथ मिळाली तर बारामतीकरांचा पाणी चोरीचा डाव उधळवून लावू. पुन्हा सोलापूर जिल्ह्याचा नाद केला नाही, पाहिजे अशी अद्दल घडवू, असा टोलाही खासदार निंबाळकर यांनी अजित पवारांना लगावला.