राज्यात रोज पंधरा हजार विवाह सोहळे होतात, पण गुन्हा फक्त माझ्यावरच दाखल झाला, असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांनी गोकुळ ही संस्था नावारूपाला आणली. दर महिन्याला गोकुळच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.असेही ते बोलताना म्हणाले.
गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, विधान परिषद, विधानसभा सर्वकाही मलाच पाहिजे, अशी पालकमंत्री सतेज पाटील यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यातूनच ते सूडाचे राजकारण करतात. असेही ते म्हणाले.
राज्यात दररोज पंधरा हजार विवाह समारंभ होतात; पण केवळ माझ्या मुलाच्या लग्नाचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला. यामागे कोण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा राजकारणाला जनताच संपवेल.असही वक्तव्य त्यांनी यावेळी केले .