पण पुढचं बजेट आता OLX वर मांडावं लागेल: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची टीका

8

मोदी सरकारने आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पावर देशातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांसह सगळ्यांच्या नजरा होत्या.

यंदाचे केंद्रीय बजेट टॅबवर मांडले गेले, पण पुढचं बजेट आता OLX वर मांडावं लागेल. कारण हे केंद्र सरकार ‘सब बेच दो’ या मानसिकतेचं आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर केली आहे.

मागच्या वर्षात चीनच्या सीमेवर सातत्याने मोठ्या झटापटी झाल्या. बंगालच्या उपसागरात चीनच्या नौदलाची घुसखोरी आहे. सागरी व्यापारी मार्गावर चीनचा हस्तक्षेप सुरू झाला आहे. असं असतानाही संरक्षणाबाबत काहीच तरतूद नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

प्रत्यक्षात या राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. म्हणजे बजेटच्या आडून भाजपाने या राज्यांचा वचननामा जाहीर केला आहे का?, असा सवालही मंत्री पाटील यांनी केला आहे.

सोशल मीडिया अकौंटवर एक व्हिडिओ शेअर करून जयंत पाटील यांनी मोदी सरकार व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाना साधला आहे. मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पात संरक्षण खर्चाबाबत काहीच सुतोवाच नाही.