काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. इराकमध्ये हुकुमशहा सद्दाम हुसैन आणि लीबियाचा मुअम्मर गद्दाफीदेखील निवडणूक घ्यायचे आणि जिंकायचे, असं राहुल गांधी म्हणाले. ते मंगळवारी एका कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात सत्ता घेतल्यानंतर देशाच्या लोकशाही स्वातंत्र्यामध्ये घसरण आली आहे. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. देशात निवडणुका होत असल्या, तरी सरकारी संस्था मजबूत असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहेत.
राहुल आपल्या ऑनलाईन संबोधनात म्हणाले की, सद्दाम हुसैन आणि गद्दाफीच्या काळातही निवडणुका व्हायच्या. ते निवडणुका जिंकायचेय. असं नाही की लोक मतदान करायचे नाहीत, पण या मतांच्या सुरक्षेसाठी कोणतीही सुविधा नव्हती, कोणतीही संस्था अस्तित्वात नव्हती.
राहुल यांनी ब्राऊन यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आशुतोष वार्ष्णेय आणि इतर फॅकल्टी सदस्यांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली.