महाराष्ट्र् सरकारने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र तो फक्त तोंड देखला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: बाईकवर दिल्लीला गेले आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. मात्र, यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे
मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाही तर आंदोलन करा. मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूना राजीनामा मागितला असता”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. भाजप घटनाबाह्य वागत आहे, असा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र, हे तीन पक्षदेखील घटनाबाह्य वागत आहेत”, अशी टीका त्यांनी केली
अधिवेशनाचे दोन दिवस कांजूरमार्ग आणि कंगनावर गेले. शेतकऱ्यांना वेळच नाही. अधिवेशन नाही तर आम्ही काय करायचं? अस सांगितलं जातं. दोन दिवसांच्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कायदा तयार केला नाही”, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.राज्य सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली.नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.