भाजपच्या प्रदेश ऊपाध्यक्षा चीत्रा वाघ सध्या महाराष्ट्रात चांगल्याच चर्चेत आहेत. पुजा चव्हान आत्महत्याप्रकरणी चीत्रा वाघ सातत्याने आवाज उठवत आहेत. याप्रकरणांत नाव पुढे आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरत महिला अत्याचारांवरुन राज्य सरकारवर त्या कडाडून टीका करत आहे. दरम्यान चीत्रा वाघ यांना याप्रकरणी धमक्यासुद्धा आल्याचे सांगीतले जात आहे. आता चीत्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी चीत्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
चीत्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ हे परळ येथील महात्मा गांधी रुग्णालयात मेडीकल रेकॉर्डर म्हणून कार्यरत होते. १९९७ मध्ये एका व्यक्तीचा स्पाईनल शस्त्रक्रियेफरम्यान मृत्यु झाला होता. प्रसंगी संबंद्धित व्यक्तीच्या भावाने निष्काळजीपणातून हा मृत्यु झाला असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडेही त्यांनी धाव घेतली होती. त्यानंतर किशोर वाघ यांनी संबंद्धित व्यक्तीस १५ लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि त्यांच्या मुलास नोकरी मिळावी अशा मागणीचा अर्ज करण्याचा सल्ला तक्रारदारास दिला आणि तेव्हाच त्यांचेकडून ४ लाख रु. लाच मागितल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या घटनेची तक्रार केली होती.
यानंतर किशोर वाघ यांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ५ जुलै २०१६ रोजी किशोर वाघ यांना एसीबीने अटक केली. डीसेंबर २००६ ते जुलै २०१६ दरम्यान वाघ यांच्याकडे असलेल्या ऊत्पन्नाचा तपास एसीबीकडून करण्यात आला. यामध्ये किशोर वाघ यांचेकडव मोठ्याप्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आढळून आली होती. वाघ यांच्या मुळ ऊत्पन्नापेक्षा ९० टक्के ही रक्कम अधिक असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर १२ फेबृवारीला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
संजय राठोड व पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणांत चीत्रा वाघ या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील महिलांवर होणार्या वाढत्या अत्याचारांचा पाढाच त्या जनतेसमोर वाचत आहेत. चीत्रा वाघ याअगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा होत्या. ऊत्कृष्ट वकृत्वामुळे त्यांनी अल्पावधीतच राजकिय क्षेत्रात प्रगती केली होती. कीशोर वाघ यांच्या प्रकरणानंतर मात्र त्यांनी अचानक २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. कीशोर वाघ यांच्या बचावाकरीताच चीत्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला असल्याच्या चर्चादेखील तेव्हा होत होत्या.