वजीराबाद पोलीस स्टेशन येथे खंडणीखोरी बाबत सखोल तपास करून पोलीस प्रशासनातर्फे गुन्हा दाखल. भारतीय दंड संहिता -१८६० अंतर्गत सेक्शन:३८३ आयपीसी अन्वये एफ. आय.आर. गुन्हा नोंद.
(एफआयआर क्रमांक (प्रथम खबर क्र.): ०५०२, वर्ष (वर्ष): २०२४ Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 13/10/2024 15:30)
नांदेड जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था , शिक्षक कर्मचारी शिक्षण संस्था कर्मचारी ,जिल्हा परिषद शिक्षण खाते तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालय (लातूर) तसेच शिक्षण संस्थेत कार्यरत महिला शिपाई कर्मचारी यांना खंडणी रक्कमेसाठी वेठीस धरणारा नोकरी घालवतो म्हणून धमकवणारा व शिक्षण खात्याशी संबंधित विविध शासकीय कार्यालया सोबत स्वतःला “वरिष्ठ पत्रकार आहे” “ राष्ट्रीय स्तरावरील संघटना नाव: पत्रकार परिष परिषद (भारत) या संघटनेशी कोणताही संबंध नसताना त्याचा मराठवाडा अध्यक्ष आहे असे सांगत व बनाव रचून तसे भासवत वरील संघटनेचे “मराठवाडा अध्यक्ष” या पदाचे खोटे तसें बिरूद मिरवत स्वतःला सोयीप्रमाणे वेळप्रसंगी जिल्ह्यातील समाजसेवक , कधी एखाद्या शिक्षण क्षेत्रातील जिल्ह्यात नावावर उपास आलेल्या संस्थेचा (साधा सभासद देखील नसताना व बनावट पावती तयार करून) स्वतःला अमुक अमुक संस्थेचा मी संस्थेचा “अजीव सदस्य/सभासद” संस्था असे स्वयंघोषित नियोजित पद्धतीने मुद्दामच म्हणवून घेत. संस्थेचे अवैध पद्धतीने विविध “बनावट लेटरहेड” तयार करून त्याचा हेतूपुरत्सर रित्या वापर फसवणुकीसाठी, खंडणीसाठी वेळप्रसंगी संस्थेतीलच कर्मचाऱ्यांना संस्था प्रशासनावरील कमिटी सदस्यांना धमकवण्यासाठी अशा बनावट दस्ताऐवजाचा वापर करत आत्तापर्यंत हा आरोपी करत आलेला आहे.
अनेक जिल्ह्यात नावारूपास आलेल्या शिक्षण संस्था व संस्थेची प्रशासन, संस्थेत कार्यरत शिक्षक कर्मचारी, महिला शिपाई कर्मचारी यांच्या बाबत शिक्षण खाते /प्रशासनाकडे धादांत-खोट्या, बनावट , मुद्देविहीन तक्रार-अर्ज पत्रव्यवहार स्वरूपात विविध शासकीय कार्यालयात दाखल करणारा इसम श्री. सखाराम रघुनाथ कुलकर्णी, वय :५८ वर्ष याच्यावर नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस स्टेशन येथे सखोल तपासाअंती सौ. निलाबाई जाधव या पीडित महिला शिपाई कर्मचारी (संस्था: जनता शिक्षण प्रसारक मंडळ, उमरदरी जिल्हा : नांदेड ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून “खंडणीखोरी” बाबत भारतीय दंड संहिता -१८६० अंतर्गत सेक्शन:३८३ आयपीसी अन्वये एफ. आय.आर. गुन्हा नोंद झाली आहे.
पोलीस स्टेशन वजीराबाद येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्हा त्याचा तपशिल : (एफआयआर क्रमांक (प्रथम खबर क्र.): ०५०२, वर्ष (वर्ष): २०२४ Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 13/10/2024 15:30).
वजीराबाद पोलीस स्टेशन येथे संपूर्ण तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय मंठाळे यांनी सर्व दस्त साक्ष पुरावा याची नोंद घेत तपास अधिकारी म्हणून काम पाहत कर्तव्य पार पाडले. फिर्यादी पक्षातर्फे त्यांचे वकील ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके यांनी गुन्हा नोंदवण्यासंबंधी सर्व फिर्याद तत्पर बाबी व पुरावा संदर्भात सहाय्य केलें.
सदर प्रकरणातील आरोपी श्री सखाराम रघुनाथ कुलकर्णी यांच्या गुन्हेगारी बॅकग्राऊंड बाबत इतर न्यायालयात दाखल असलेल्या फिर्यादी प्रकरण बाबत तपशीलवार माहिती खालील प्रमाणे:
I. फिर्यादींचे वकील ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके यांनी माहिती देत सांगितले की ; सदर आरोपी विरोधात यापूर्वी फिर्यादी पक्षातर्फे संस्था अध्यक्ष शिवाजी जाधव यांची बाजू मांडत क्रिमिनल कोर्टा : 8वी JT. CJJD JMFC यांचे न्यायालय नांदेड येथे रितसर सदर प्रकरणातील आरोपी श्री. सखाराम रघुनाथ कुलकर्णी यांच्यावर कलम : 156 (3) सीआरपीसी अन्वये गुन्हा नोंदणी बाबत प्रकरण क्रमांक: इतर संकीर्ण. Cri.Appln/0000657/2024 प्रकरण नाव: शिवाजी नागोराव जाधव विरुद्ध राज्य महाराष्ट्र दिनांक: 19-09-2024 पासून चालू असून सदर प्रकरणात “ नोटीस इशू” होऊन फिर्यादी पक्षातर्फे ऑर्गुमेंट / मसलत झालेली आहे.
II. फिर्यादींचे वकील ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके यांनी माहिती देत सांगितले की ; श्री. सखाराम रघुनाथ कुलकर्णी यांच्यावर बनावट व्हाट्सअप ग्रुप तयार करून संस्था प्रशासन संस्था अध्यक्ष व कर्मचारी यांची नाहक बदनामी करणे व बदनामी कारक मजकूर पसरवणे याबाबत गुन्हा नोंद व्हावा यासाठी क्रिमिनल कंप्लेंट क्रमांक 239 /2020 हे देखील जे एम एफ सी कोड नांदेड जिल्हा महानगर दंडाधिकारी यांच्या कोर्टात चालू असून पुराव्याच्या स्टेजला आहे.
नांदेड जिल्ह्यातील शिक्षण संस्था शिक्षक कर्मचारी तसेच अनेक संस्था प्रशासन यांनी दिलेल्या प्रदीर्घ काळ दिलेल्या लढ्याला वजीराबाद पोलीस स्टेशन येथे खंडणीखोरी बाबत दाखल करण्यात आलेल्या गुन्हा नोंद एफ आय आर च्या अनुषंगाने सदर व्यक्तीच्या कृष्णकृत्याला वाचा फुटत पोलीस प्रशासन यांनी सखोल तपास करून दखल घेत गुन्हा नोंदी मुळे व पुढे चालणाऱ्या खटल्यात त अनेक निष्पाप कर्मचारी यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटून पुढे न्याय मिळेलच व एकंदरीत आतापर्यंत शिक्षण क्षेत्रातील संस्था प्रशासन कर्मचारी यांच्या मध्ये सदर अन्यायाबाबत होणारी घुसमट व आक्रोश याला वाचा फुटल्यामुळे वजीराबाद पोलीस स्टेशन पोलीस प्रशासन, फिर्यादी महिला कर्मचारी यांच्या निर्भिड वृत्ती बाबत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे. ही भावना नांदेड जिल्हा शिक्षण क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.
FIR Copy

