कर्मवीर विद्या प्रबोधिनी व करिअर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.१८) करिअर डे साजरा करण्यात आला आहे. टेक्निकल हायस्कूल बारामती येथे करिअर डे चं आयोजन करण्यात आले होते.
या दिनानिमित्त आयोजित करिअर व्याख्यानमालेसाठी जगताप एस. सी.आणि नामदे एस. एस. यांची उपस्थित होती. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य काकडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे जगताप सरांनी विद्यार्थ्यांना दहावी नंतर करिअरच्या संधी व करिअर निवडताना लक्षात घ्यावयाच्या बाबी समजावून सांगितल्या. 14 जानेवारी ला करिअर दिन का साजरा करतात याचे महत्त्व समुपदेशक होलमुखे ए. वाय. यांनी सांगितले. याप्रसंगी उप- मुख्याध्यापक मोहिते सर, पर्यवेक्षक बाबर सर यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.