परभणी जिल्ह्यातील सेलू पोलिसांनी रविवारी काल रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणावर केलेल्या कारवाईत 57 हजार रुपयांच्या देशी दारू आणि एक कार जप्त केली आहे. सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत दारूचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. मात्र पोलिसांनी आता त्यावर कारवाई केली आहे.
सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथे मोठ्या प्रमाणात दारूचा अवैध साठा करून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी देऊळगाव गात येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरील ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे १० दारुचे खोके आढळले. यावेळी सेलू पोलिसांनीे 27 हजार 456 रुपयांची दारू जप्त केली. बालकिशन साळवे याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच रविवारी रात्री दहाच्या सुमारास सातोना येथून देऊळगाव गात येथे एका कारमधून अवैध पद्धतीने विकन्यासाठी दारू आणल्या जात असल्याची माहिती सेलू पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी देऊळगाव गात ते डासाळा रोडवर फौजदार संतोष माळगे पेट्रोलिंग करत असताना राधे धामनगाव पाटीवर एक पांढऱ्या रंगाची करचा पाठलाग करून थांबवली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन कार मधील एक जण फरार झाला.
कारची तपासणीमध्ये दारूचे बारा बॉक्स पोलिसांना सापडले. पोलिसांनी 29 हजार 952 रुपयाची दारू व कार असा एकूण एक लाख 79 हजार 952 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गजानन गवळी हे करीत आहेत