केंद्र सरकारने निर्यात कोट्याचे पुनरावलोकन करावे : हर्षवर्धन पाटील

12

साखर निर्यात लवकर होण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने सुविधा उपलब्ध करून देण्याची तसेच केंद्र सरकारने निर्यात कोट्याचे पुनरावलोकन करण्याची मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे .

चार्जेस प्रति टन 700 रुपये करावेत, बंदरांवर मोफत साठवणूक कालावधी 30 ऐवजी 60 दिवस करावा व त्यानंतर साठवणूक चार्ज प्रती मेट्रिक टन 30 रुपये हा 15 दिवसांऐवजी 60 दिवसांसाठी करावा, अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्टकडे राज्य साखर कारखाना महासंघाने केली आहे.

महाराष्ट्रामध्ये जयगड व आंग्रे-रत्नागिरी खासगी बंदराबरोबरच मुंबई पोर्ट ट्रस्ट येथून राज्यातील साखर कारखाने साखर निर्यात करतात. महाराष्ट्रातील कारखान्यांसाठी 18.69 टन साखरेचा निर्यातीसाठी कोटा आला आहे असेही पाटील म्हणाले.

2019 मध्ये शेतकऱ्यांना एफआरपीची रक्‍कम देण्यासाठी घेतलेल्या सॉफ्ट लोन कर्जावरील व्याज अनुदान हे साखर कारखान्यांना अटींमध्ये शिथिलता आणून तात्काळ अदा करावे, अशी मागणीही नाबार्डकडे केल्याची माहिती पाटील यांनी दिली.