दिल्लीत प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या आंदोलनात भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या वेषात आपल्याच लोकांना लाल किल्ल्यावर पाठवून हिंसा घडवून आणली होती.असा आरोप काँग्रसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
अमित शहांसारखा ताकदवान गृहमंत्री असताना काही लोक लाल किल्ल्यावर पोहोचलेच कसे? हाच मोठा प्रश्न आहे. याचा तपास होणार नाही का? प्रजासत्ताक दिनाला सर्वाधिक सुरक्षा राजधानी दिल्लीत असते. तर मग हे कसं घडलं? चौधरी यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या विरोधात छळाचा आणि बळाचा वापर केल्याचा आरोप केला आहे .
पंतप्रधानांना शेतकऱ्यांशी बोलायला वेळ नाहीये का? एवढा अहंकार कशासाठी? शेतकऱ्यांची स्थिती दयनीय असल्याचं म्हणत त्यांनी सरकारला सुनावलं आहे की, आपण बहुमताचा बळाने वापर करणे थांबवा. शेतकऱ्यांविरोधातील ही लढाई थांबवा.
तुम्ही मोठ्या चतुराईने शेतकरी नेत्यांनार आरोप दाखल केलेत. आपण छळाने नव्हे तर बळाने शेतकऱ्यांना दाबू इच्छिता असाही आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.