भारतात केंद्र सरकारने आयटीसंबंद्धित नविन नियमावली लागू केली आहे. सर्व समाजमाध्यमांना या नियमावलींच्या अधीन राहूनच भारतात काम करायचे आहे. मात्र ट्वीटरने अद्यापही नियमांचे पालन केले नसल्यामुळे केंद्र सरकारने ट्वीटरला नोटीस पाठवली आहे. शिवाय ही अंतिम संधी असून नियमांचे पालन न केल्यास भारतीय कायद्यान्वये कारवाई केली जाईल असा ईशाराच दिला आहे.
२५ फेबृवारी रोजी केंद्र सरकारने आपल्या देशात आयटीसंबंद्धित नविन नियमावली जाहीर केली होती. ज्यामध्ये ५० लाखापेक्षा अधिक युजर्स असणार्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मला भारतात तक्रार निवारण अधिकार्याची नेमनुक करण्याची सुचना होती. याकरिता तीन महिन्यांचा कालावधीसुद्धा देण्यात आला होता.
दरम्यान २८ मे रोजी तक्रार निवारण अधिकारी नेमल्याची माहितीसुद्धा ट्वीटरने दिल्ली ऊच्च न्यायालयात दिली होती. मात्र ट्वीटरच्या या ऊत्तरावर आम्ही समाधानी नसल्याचे केंद्र सरकारने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
भारतात ट्वीटरने नेमलेले तक्रार निवारण अधिकारी व नोडल अधिकारी हे ट्वीटरचे अधिकृत कर्मचारी नाही. हे सर्व नियमांत बसणारे नाही. अशावेळी ट्वीटरने त्वरीत नविन आयटी नियमावलींचे पालन करावे. ट्वीटरसाठी ही शेवटची संधी असणार आहे. असे केंद्र सरकारने पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.