प्रतिनिधी – अजिंक्य जवळेकर
कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या केंद्रिय पथकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सद्यस्थितीत महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वेगाने फैलावत असल्यामुळे केंद्रिय पथकांकडून महाराष्ट्रात विविधठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला जातो आहे. वाशिम जिल्ह्यातसुद्धा केंद्रिय पथकाने जिल्ह्यातील विविध लसीकरण, आरोग्यकेंद्रांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
केंद्रिय पथकाकडून वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोवीड लसीकरन केंद्र, वाशिम शहरातील नागरी आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी भेटी देण्यात आल्या. यावेळी लसीकरण केंद्र आणि आरोग्य केंद्रांची पाहणी करण्यात आली.
केंद्रिय पथकाचे सदस्य व दिल्ली येथील राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे डॉ. पुनीत अेरोरा यांनी लसीकरण केंद्रावर ऊपस्थितांशी संवाद साधला. लसीकरणानंतर घ्यावयाच्या काळजीसंबंद्धी काही सुचना केल्या तसेच लस घेतलेल्यांना लसीकरणाबाबत समाजात जनजागृती करण्याचे आवहनसुद्धा त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्यासह आरोग्यविभागातील सर्व अधिकारी प्रामुख्याने ऊपस्थित होते.