रामाच्या नावावर चंदा हाच भाजपचा धंदा कॉंग्रेस प्रवक्त्याची टीका

15

अयोध्येमध्ये भव्य राममंदिर उभारणीसाठी राममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट व विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमाने देशपातळीवर निधी समर्पन अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून घरोघरी जाऊन रामाच्या नावावर निधी गोळा केला जात आहे. परंतु भाजप, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे. असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. सोबतच राममंदिर निर्मितीसाठी समर्पित करीत असणारा निधी थेट राममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये जाईल याची दक्षता जनतेने घ्यावी, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.

जनतेले भावनिक साद घालत रामाच्या नावावर पैसा गोळा करणे हे भाजप आणि संघपरिवाराचे जुने काम आहे. त्यामुळे हा पैसा भाजपच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. आजपर्यंत गोळा केलेला निधी सदर ट्रस्टलाच भाजप-आरएसएसने पोहोचवला की नाही याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणीसुद्धा सचिन सावंत यांनी केली.

पत्रकार परिषेदला संबोधित करताना सावंत यांनी याविषयी संबंद्धित ईतर मुद्द्यांनाही हात घातला. राममंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणार्‍या निर्मोही आखाडय़ाने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले 1400 कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने 2015 साली विश्व हिंदू परिषदेतर्फे 1400 कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपसुद्धा झाला होता. त्याचे उत्तर वि.हि.प. तर्फे अद्यापही दिले गेलेले नाही किंवा याची चौकशी करण्याची तयारी भाजपच्या कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही, अशी माहिती देत त्या १४०० कोटींचे काय झाले असा सवालदेखील त्यांनी ऊपस्थित केला.