महाविकास आघाडीने केलेल्या नियोजनामुळे यंदा पाचही जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुणे पदवीधर मतदारसंघातून हॅट्ट्रीक करण्याचे स्वप्न भंगणार असून ते क्लीन बोल्ड होणार आहेत,’ असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला आहे.
काल सतेज पाटील यांनी दौलतराव भोसले विद्यालय येथे मतदानाची पाहणी केली होती. दरम्यान प्रसारमाध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधला. त्यावेळी सतेज पाटील म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच अटीतटीची झाली आहे. मतदारांची नोंदणी, प्रचार, मेळावे, मतदानासाठी मतदारांना घराबाहेर काढणे या सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी काम केले आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहचले होते. यामुळे महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा निश्चित आहे. चंद्रकांत पाटील यांची हॅट्ट्रिक होणार नाही तर ते क्लिन बोल्ड होणार आहेत.
भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमूख आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम सांगली जिल्ह्यातील एका बुथवर समोरासमोर आले. त्यावेळी दोघांनीही एकमेकांना नमस्कार केले. दोन ओळखीचे लोक सामोरासमोर आल्यावर नमस्कार करतात. त्याप्रमाणे त्यांनी नमस्कार केला असेल. त्याचा वेगळा अर्थ काढू नका.’ असेही सतेज पाटलांनी म्हंटले आहे.