चंद्रकांत दादांनी एकदा चष्म्याच्या काचा स्वच्छ पुसाव्यात : रुपाली चाकणकर

25

चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुणे येथील कोरोना परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर पुण्यातील प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. 

ते सध्या आहेत तरी कुठे? असा सवाल उपस्थित करीत अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी मागणीही केली. 

चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटल आहे की, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादांनी एकदा चष्म्याच्या काचा स्वच्छ पुसाव्यात. त्यांना सकाळी ६ वाजता जनतेच्या कामासाठी धावणारे दादा दिसतील !.