ईंधन दरवाढीवर चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सल्ला! काय म्हणाले पाटील

8

ईंधनाचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांनी पेट्रोलच्या दरांत शंभरी पार केली आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारकडून ईंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारला धारेवर धरले जात आहे. यांस प्रत्युत्तर देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

सतत केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्याने ईंधनावरील आपला कर कमी करावा. अलिकडे प्रत्येक बाबीसाठी केंद्र सरकारला जवाबदार धरले जाते आहे. परंतू ईंधनावर राज्य सरकारसुद्धा कर आकारते. अशावेळी राज्याने आपला कर कमी करावा. परिणामी ईंधनाचे दर आपोआप कमी होतील. असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

ईंधन दरवाढीवरुन कॉंग्रेस चांगलीच आज्रमक झाली आहे. ईंधन दरवाढीवरुन पुण्यात कॉंग्रेसने जोरदार आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या गेल्या. तसेच नरेंद्र मोदी यांचा महागाईचा भस्मासुर असा ऊल्लेखसुद्धा करण्यात आला.

महाराष्ट्रात कॉंग्रेस महाविकासआघाडीसोबत सत्तेत आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारची बाजू सांभाळत ऊलटे राज्य सरकारवरच टोलेबाजी केली. महाराष्ट्रासह देशात ईंधनदरवाढ सुरुच आहे. त्यामुळे ईंधन दरवाढीवरुन राजकारणसुद्धा चांगलेच तापते आहे.