“अशी मानसिकता असणार्‍या पक्षांचा लवकरच सफाया होईल” चंद्रकांत पाटील संतापले

9

कॉंग्रेसचे नेते आणि महाविकासआघाडी सरकारमधील सामाजिक कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधुंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरुन भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीने वडेट्टीवा यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करु असा ईशारासुद्धा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसवरसुद्धा टीका केली आहे.

“कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून कायमच हिंदू धर्मातील साधु-संतांचा अवमान केला जातो. या दोन्ही पक्षातील नेते हे मान्य करण्यासच तयार नाहीत की राममंदिराचे निर्मितीकार्य भाजपाच्या सरकारमध्ये पुर्णत्वास जाते आहे. आणि यामध्ये प्रत्येकास योगदान देण्याची ईच्छा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील नेते कायम हिंदू धर्माच्याविरोधात बोलत असतात. कधी आपल्या साधुंना ते नालायक म्हणतात तर पालघरसारख्या घटनांना दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशी विचारसरणी असलेल्या पक्षांचा लवकरच सफाया होणार आहे”. असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

विजय वडेट्टीवारांनी साधुंचा ऊल्लेख नालातक असा केला आहे. तसेच आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचेदेखील ते म्हणाले. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. संत हा समाजाला समर्पितब असतो तर साधु हे लुटारु असतात असे स्पष्टीकरण वडेट्टीवार‍ांनी यावेळी दिले. वडेट्टीवारांनी साधुंबद्दल केलेल्या या विधानामुळे भाजपाने त्यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अयोध्या येथे उभारण्यात येणार्‍या राममंदिनिर्मितीसाठी विश्व हिंदू परिषद व रा.स्व.संघ यांच्यावतीने राममंदिर निधी समर्पन अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये घरोघरी जाऊन कार्यकर्ते निधी गोळा करत आहे. या अभियानास लक्ष करुन कॉंग्रेसचे नेते या अभियानावर टीका करत आहे. कॉंग्रेस नेत्यांकडून या अभियानाची तुलना थेट खंडणीशी केली जाते आहे. यावर भाजपाने “मुघलांच्या अनुयायांना ही खंडणीच वाटणार” अशा शब्दांत ऊत्तर दिले आहे.