चंद्रकांत पाटलांनी ऊलगडले, पवार-फडणवीस भेटीमागील रहस्य!

15

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मे रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना ऊधाण आले होते. या भेटीमागील नेमके कारण आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.

शरद पवार सध्या आजारी आहेत. राज्यातील अनेक नेते शरद पवारांची भेट घेत आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील मोठे व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवत देवेंद्र फडणवीस यांनी ते आजारी असल्यामुळेच त्यांची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली. विनाकरण या भेटीला वेगळे रंग देण्याचा प्रयत्न होतो आहे. तसे काहीही नाही. भाजपचा संघर्ष हा कायम राहणार. असे ते यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच खा. रक्षा खडसे यांचीसुद्धा भेट घेतली. या पार्श्वभूमिवर पत्रकारांनी चंद्रकांट पाटलांसमोर प्रश्न ऊपस्थित केले. त्यावर ते ऊत्तर देत होते. यावेळी नाथाभाऊ काही आमचे शत्रू नसून ते आमचे पालक आहेत. असेसुद्धा ते यावेळी म्हणाले.

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.