चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात : अमोल मिटकरी

15

काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच  दिसतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले. 

पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. मात्र, त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नयेत. राज्यात पुढील 15 वर्षे महाविकासआघाडीची सत्ता असेल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. 

आता या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.