महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मी कोल्हापुरातून निवडून येईन यासंदर्भात वक्तव्य केलं होतं, त्यालाच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
‘कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही, त्यामुळे कुणी राजीनामा द्यायचा प्रश्न नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत, त्यामुळे त्यांनी येथून निवडणूक लढवली तर त्यांचा डिपॉझिट जप्त होईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झाला आहे,’ असा टोलाच हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
कोल्हापूरातील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून एखाद्याने राजीनामा द्यावा आणि तेथे पोटनिवडणूक घ्यावी जर मी निवडून आलो नाही तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असं खुलं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिलं होतं. त्यालाच मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.