चंद्रकांत पाटलांना कोथरूडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातून आणतो; ‘या’ नेत्याने घेतली जबाबदारी

165

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा दारुण पराभव केला होता. खानापूरात शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळालं.

खानापूरचा निकाल चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का असल्याचं बोललं जात होतं. यामुळेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली होती. सोबतच चंद्रकांत पाटील यांनी सुरक्षित अशा पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली असल्याने त्यावरून कायमच विरोधक टीका करत असतात.

त्यावर आता माजी खासदार संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो, असं माजी खासदार संजय काकडे म्हणालेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांना 100% निवडून आणू. त्यांचा प्रचारप्रमुख पण मी होईन. कोथरूडमध्ये पण प्रचाराची माझ्याकडेच जबाबदारी होती, हेसुद्धा संजय काकडेंनी अधोरेखित केलंय.