भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत. हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. असे सूतोवाच काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. असे पटोले यांनी म्हटले आहे.
म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल, असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. भाजप प्रदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणूक घेण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर पटोलेनी आपली भूमिका जाहीर केली.