चंद्रकांत पाटलांची उपरोधात्मक टीका 

10

भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्र 19 येथे नगरसेविका अर्चना पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी ते म्हणाले, ”भविष्यात मोठे काम करायचे आहे, ही दुरदृष्टी ठेवून जनसंपर्क कार्यालय उभारले आहे, ही महत्वाची बाब आहे. हा सर्व भाग गरिब आणि मध्यमवर्गीयांचा आहे, त्यामुळे त्यांची कामे झाली पाहिजेत.

या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक, सुनिल कांबळे, भीमराव तापकिर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, माजी मंत्री दिलीप कांबळे, तुषार पाटील, नगरसेविका मनीषा लडकत यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.

हा भाग काही ठराविक लोकांच्या वर्चस्वात होता, त्यांचे वर्चस्व मोडून काढून भाजपने याठिकाणी विकासाचा प्रवाह आणला.आगामी महापालिका निवडणूकीत या प्रभागात भाजपचे चार नगरसेवक निवडून येतील असा दावाच त्यांनी केला असे अर्चना पाटील म्हणाल्या. ”हम किसीको टोकेंगे नही, यदि किसीने टोका तो हम उन्हे छोडेंगे भी नही”, असा इशारा विरोधकांना देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपरोधात्मक टीका केली. पुण्यात जनसंपर्क कार्यालयाच्या उ्दघाटन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.