भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे वादग्रस्त विधानांसाठी नेहमिच चर्चेत असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांचा कायमच रोख असल्याचे जाणवते. जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या ऊद्घाटनावरुन पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली आणि त्यानंतर चांगलेच रान पेटले. “शरद पवार हे वाईट प्रवृत्तीचे आहेत, भ्रष्टाचारी आहेत, त्यामुळे त्यांचे हात आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्यास लागू देणार नाही” असे म्हणत पवारांच्या हस्ते होणारे ऊद्घाटन पडळकरांनी अगोदरच स्वहस्ते निपटवून घेतले. यानंतर मात्र पडळकरांवर राष्ट्रवादीच्या गोटातून चांगलीच टीका करण्यात आली.
पडळकर पवारांवर नेहमिच टीका करत असतात. याअगोदरसुद्धा त्यांनी “पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना” अशी टीका केली होती. तेव्हा मात्र दवेंद्र फडणवीसांनी त्यांना पंढरपुर येथे बोलावून समजूत दिली होती. या कृत्यानंतर भाजप त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते. परंतू सोबतच त्यांना दमसुद्धा देत असते. असाच प्रकार सांगलीतील पत्रकारपरिषदेत घडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना पडळकरांच्या या कृत्याबद्दल विचारले असता, त्याठिकाणीच पडळकरांकडे बघत चंद्रकांत दादांनी त्यांना दम दिला. परंतू शरद पवारांवर सौम्य टीका करण्याचेसुद्धा ते विसरले नाहीत.
“शरद पवारांनी धनगर समाजाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या युवकांमध्ये त्यांच्याबद्दल रोष असणे साहजिकच आहे. पडळकरांना याठिकाणी मी जाहीरपणे सांगू ईच्छितो की, आपला रोष जरुर व्यक्त करावा, त्यांना जे बोलायचे आहे तेच बोलावे, परंतू थोडे नीट बोलायचे असते” असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
गोपीचंड पडळकर यांचे राजकीय जीवन हे प्रचंधस गोंधळाचे राहिले आहे. पडळकर धनगर समाजातून येतात. धनगर समाजावर त्यांचा प्रभाव आहे. अगोदर ते वंचित बहूजन आघाडीत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत वंचित बहूजन आघाडीच्या तीकीटावर त्यांनी सांगली मतदारसंघाची निवडणुक लढवली. यामध्ये त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांत अजित पवार यांच्याविरुद्ध बारमतीतून निवडणूक लढवली. यामध्येसुद्धा पडळकरांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर विधानपरिषदचे आमदार म्हणून ते निवडून आले.