जेजुरीच्या खंडोबारायाच्या दर्शनासाठी वेळेत बदल

5

जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने 28 मार्च 2021 च्‍या कोवीड- 19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

यानुसार आता जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांना वेळेत बदल करण्यात आला आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिर सकाळी ७ ते संध्याकाळी ८ या वेळेत खुले राहणार आहे.

या आधी वेळ पहाटे ५ ते सायंकाळी ९ वाजेपर्यत होती.मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे. अशी माहिती मार्तंड देवस्थानचे विश्वस्त संदीप जगताप यांच्याकडुन देण्यात आली आहे.