नांदेड जिल्ह्यातील रहिवासी तथा ऑन रेकॉर्ड आरोपी श्री.सखाराम रघुनाथ कुलकर्णी याचा “खोटेपणा” उघडं व नावाजलेल्या शिक्षण संस्थेचे स्वयंघोषित अजीव सभासदत्व बळकवण्याचा कट उप-धर्मदाय आयुक्त (नांदेड) यांच्या न्यायालयीन आदेशाने उधळला ! अखेर ‘सत्याचाच’ विजय ! “सत्य परेशान होता है, मगर पराजित नही !” या वाक्यातील विश्वास पुन्हा एकदा उपधर्मादाय आयुक्त नांदेड यांच्या निकालाने सिद्ध ! सबंध नांदेड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला वेठीस धरणारा आरोपी श्री. सखाराम रघुनाथ कुलकर्णी याचा “खोटेपणा” पुन्हा एकदा उघडं! उपधर्मादाय आयुक्त नांदेड यांच्या न्यायालयाचा निर्णय त्या अन्वये श्री सखाराम कुलकर्णी याचे “आजीव सदस्य/ सभासद” असण्याचा केलेला दावा बोगस व सपशेल खोटा न्यायालयाच्या निकालाने सिद्ध.
खोटी बनावट पावतीचा आधार घेऊन व बनावट पत्र बनवत स्वतःला स्वयंघोषित पद्धतीने बनविले होते / सर्वत्र म्हणवून घेत होता “आजिव सदस्य /सभासद” जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड, जिल्हा: नांदेड.उपधर्मादाय आयुक्त नांदेड यांच्या न्यायालयाचा निर्णय दिनांक 28. 03. 2025 रोजी याबाबत देण्यात आला निर्णयाचे अवलोकन केले असता पान क्रमांक 14 व 15 असलेला मुद्दा क्रमांक: २१ व २२(मराठी भाषेत) अनुसार श्री सखाराम रघुनाथ कुलकर्णी याचा स्वयंघोषित पद्धतीने करण्यात आलेल्या दावा सपशेल खोडून काढलेला आहे. न्यायालयाच्या निकालाचे अवलोकन केले असता निकालाच्या प्रतीमध्ये खालील बाबी माननीय न्यायाधीशाने निकाल देताना स्पष्ट केलेले आहेत.
२१. आक्षेपकर्ता क्रमांक २, म्हणजेच स्वयंघोषित पद्धतीने स्वतःला संस्थेचा “अजीव सदस्य सभासद” बनवले होते तो श्री. सखाराम कुलकर्णी यांच्या अर्जानुसार, ते ट्रस्टचे आजीवन सदस्य आहेत. त्यांच्या अर्जाच्या समर्थनार्थ त्यांनी : दिनांक : २०.११.१९९३ रोजीची सदस्यता पावती परिच्छेद १२३ अंतर्गत दाखल केली .आणि दिनांक: ३१.१०.१९९३ रोजीचे तत्कालीन अध्यक्ष नागोराव जाधव यांनी जारी केलेले पत्रही दाखल केले जे परिच्छेद १२४ वर आहे. उलटतपासणी दरम्यान, आक्षेपकर्ता क्रमांक २ ने १. कबूल केले की, त्यांनी ट्रस्टचे सदस्य होण्यासाठी वॉर्ड प्रवेश शुल्कासाठी १/- रुपये शुल्क भरलेले नाही. त्यांनी हे देखील २. कबूल केले की ; सर्व सदस्यांनी ट्रस्टच्या सर्वसाधारण बैठकीला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. (असे असताना देखील ते सर्व बैठकींना गैरहजर राहिलेले आहेत). त्यांनी , ३. कबूल केले की ; १९९३ ते २०२४ पर्यंत झालेल्या ट्रस्टच्या कोणत्याही सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याबद्दल त्यांना माहिती नाही. त्यांनी हे देखील, ४. कबूल केले की ; १९९३ ते २०२४ पर्यंतच्या स्वीकृत बदल अहवालाची नोंद अनुसूची-१ मध्ये नोंदवली गेली आहे आणि त्यांनी त्या आदेशाविरुद्ध कोणतेही अपील दाखल केलेले नाही. त्यांनी हे देखील, ५. कबूल केले आहे की ; १९९३ पासून त्यांनी ट्रस्टच्या सचिव आणि अध्यक्षांशी पत्रव्यवहार केला नाही, त्यांना ट्रस्टच्या सर्वसाधारण सभेला का आमंत्रित केले गेले नाही, तसेच त्यांना विचारले नाही की ट्रस्टच्या सर्वसाधारण सभा होतात की नाही. ते ६. कबूल करतात की ; ट्रस्टच्या सर्व निवडणुकांमध्ये भाग घेणे हे सदस्यांचे कर्तव्य आहे. १९९३ पासून आजपर्यंत ट्रस्टच्या निवडणुका झाल्या आहेत की नाही हे त्यांनी ट्रस्टच्या सचिव आणि अध्यक्षांना विचारले नाही. व त्यांनी त्या कार्यालयाला सर्वसाधारण सभेच्या तसेच सोसायटीच्या निवडणुका नियमितपणे होतात की नाही हे विचारले नाही.७.कबूल केले आहे की ; त्याने २०१८ पासून ट्रस्टच्या व्यवस्थापनाबाबत तक्रारी केल्या आहेत. १९९३ पासून त्याने ट्रस्टच्या निवडणुकीबाबत निर्देशांसाठी न्यायालयात कोणताही अर्ज केलेला नाही. (हे देखील खरे आहे की, १९९३ पासून त्याने ट्रस्टच्या सदस्यत्वाबाबत कोणताही अर्ज केलेला नाही, केवळ बदल अहवाल वगळता).८. कबूल केले आहे की ; मुद्दा क्रमांक २२. आक्षेपकर्ता क्रमांक २ ने अध्यक्षांकडून जारी केलेल्या वर्गणीच्या पावत्या आणि पत्राची नोंद फक्त नोंदवली. त्यांचे सदस्यत्व सिद्ध करण्यासाठी इतर कोणतेही कागदोपत्री पुरावे रेकॉर्डवर ठेवलेले नाहीत, म्हणून, “आक्षेपकर्ता क्रमांक २ चे “सदस्यत्व सिद्ध करणे पुरेसे नाही…! “वरील निकाल देताना माननीय उपधर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयाने उच्च न्यायालय खंडपीठ यांनी दिलेल्या निर्णयाचा निर्वाळा घेत यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या खटल्याचा दाखला दिला. (माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर येथील खंडपीठाच्या निर्णयानुसार, अब्दुल सत्तार शेर मोहम्मद विरुद्ध हाजी मुस्ताक अहमद शेर मोहम्मद आणि इतरांच्या प्रकरणात, २००९ मध्ये नोंदवलेले (१) मह. एल. जे. पृष्ठ ४४१ ). त्यानुसार, स्वतःला अजीव सदस्यता सभासद असे स्वयंघोषनेने म्हणून घेणारा श्री सखाराम कुलकर्णी या व्यक्तीने ; यापूर्वी कोणताही लेखी अर्ज नाही किंवा आक्षेपकर्ता क्रमांक २ ने सदस्यत्व अर्जासोबत रु. १/- प्रवेश शुल्क भरलेले नाही की जे “अनिवार्य प्रक्रिया होती”.९. कबूल केले की, “सदस्यत्व अर्ज दाखल केला नाही” आणि “त्याने प्रवेश शुल्क रु. १/ जमा केले नसल्याचे कबूल केले”.त्यामुळे, आक्षेपकर्ता क्रमांक २ (म्हणजेच श्री सखाराम रघुनाथ कुलकर्णी) या आरोपी असलेल्या तथा खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीचे जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी या संस्थेसंबंधी कुठलेही कसलेही दुरान्वये “सदस्यत्व सिद्ध होत नाही.” यापूर्वी श्री. सखाराम रघुनाथ कुलकर्णी यांनी स्वतःला बनावट पावतीच्या व बनावट पत्राच्या आधारे सर्व शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार करण्यासाठी संस्थेचा अजीव सदस्य सभासद असल्याबाबत केलेला दावा हा अत्यंत बोगस व दिशाभूल करणारा असल्याचा निर्वाळा न्यायालयाने निकालात देत यासंबंधी आरोपी असलेल्या जेष्ठ बनावट तथा तोतया पत्रकार श्री. कुलकर्णी याचा खोटेपणा उघडकीस आणला गेला. यानंतर या निकालामुळे संस्थेत काम करणारे सर्व शिक्षक कर्मचारी संस्था प्रशासन तसेच संस्थेसंबधी कार्यरत शिक्षक वृंद यांनी सुटकेचा निःश्वास सोडला .आरोपी श्री. सखाराम रघुनाथ कुलकर्णी यांच्या स्वतःला अजीव सदस्य सभासद बनवून घेत संस्थेसंबंधी पूर्वी केलेल्या शासकीय कार्यालय मध्ये खोट्या तक्रारी तसेच खंडणी साठीचे उत्स्फूर्त प्रयत्न यामुळे संस्था कर्मचारी प्रशासन यांचा होणारा अतोनात मानसिक छळ यामधून संस्थेची कायमची “सुटका” उपधर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयाच्या निकालामुळे झालेली आहे व सत्याचा विजय झाला. याबद्दल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. शिवाजीराव नागोराव जाधव , संस्था सर्व सभासद , संस्थेचे मुख्याध्यापक , शिक्षकवृंद यांनी या आरोपी विरोधात न्यायालयामध्ये दिलेली चिवट झुंज त्या संदर्भात संस्थेचे सर्व लीगल ॲडव्हायझर , वकील यांची टीम यांचे विशेष कौतुक. तसेच , संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री शिवाजीराव नागोराव जाधव व संस्था सर्व सभासद यांनी सदर खंडणीखोर व्यक्तीचा “खोटेपणा” उघडकीस आणण्यासाठी समर्पक लढाऊ वृत्तीने घेतलेले अतोनात परिश्रम व प्रसंगी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना आलेले हे यश उल्लेखनीय व कौतुकास्पद ! याबद्दल त्यांचे अभिनंदन नांदेड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व स्तरातून होत आहे
बातमी या प्रकरणातील वकील शोमितकुमार साळुंके यांच्या प्रेसनोटप्रमाने केलेली आहे

