मोबाईलवर संभाषण आणि चॅटिंग करून एका महिलेकडून १ लाख १६ हजार ५०० रुपये उकळणाया दोघांना लातूर पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ही कारवाई २४ तासांमध्ये केली. आरोपींनी त्या महिलेकडून उकळलेल्या पैशातून खरेदी केलेल्या दोन दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. लातूर येथील एका महिलेशी आरोपीने मोबाईलवर संपर्क करून तिचा मित्र असल्याचे भासविले. त्यानंतर व्हॉटस्अॅपवर चॅटिंग करून जवळिकता साधली. प्रेमाचे नाटक करून जाळ्यात ओढले.
तुझ्या पतीला घटस्फोट दिला तर तुला मी सांभाळतो असं म्हणत तुझ्याकडे असलेले पैसे मला पाठव असे आरोपीने सांगितलं. या थापेला बळी पडून १ लाख १४ हजार रुपये सदरील महिलेने पाठवले. सदरची रक्कम टाकल्यानंतर दोघे फोन करून ‘ तू समजतेस तो मी तुझा मित्र नाही, माझे खरे नाव मी तुला सांगणार नाही, तु मला दिलेल्या पैशाबद्दल कुठे तक्रार केलीस, माझ्यासोबत व्हॉटस्अॅपवर केलेली चोटिंग व वैयक्तिक संभाषण प्रसारित करून तुझी बदनामी करीन, वडिलांना येऊन मारहाण करीन, अशी धमकी दिली. सदरील महिलेने लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.