राज्यात सध्या मोठया प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे, याच पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीत अतिशय चिंताजनक बनत चालली आहे. या सर्व प्रकाराला भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभाराला जबाबदार ठरवत जोरदार टीका केली आहे.
त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधतं ट्विट करून टीका केली आहे. ते आपलट विटमध्ये म्हणतात की, मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुधा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील. अर्थात ही बाब प्रकाश आंबेडकरांच्या फार उशीरा लक्षात आल्याचे दिसते आहे.
प्रकरण असे की, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
राज्यात सध्या कोरोना काळात राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी टोला लगावला होता. याच टीकेचा आधार घेत अतुल भातखळकर यांनी टीका केली होती.