विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर

1

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनामध्ये विशेष मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. वर्षभरात मुख्यमंत्री म्हणून आलेला अनुभव आणि कामाबद्दल त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. त्यावेळी ‘मातोश्री’तुन बाहेर का पडत नाही या विरोधकांनी केलेल्या टिकेवर त्यांनी पहिल्यांदाच ‘हे करू नका,ते करू नका अस मी जनतेला सांगतोय आणि मीच फिरतोय हे योग्य नव्हे ‘ अस चोख प्रत्युत्तर दिले आहे.

कोरोना येण्याआधी माझा महाराष्ट्र दौरा सुरू होता . सगळीकडे मी फिरत होतो .संपूर्ण राज्याची पाहणी करत होतो.हे माझ्यासाठी काही नवीन नाही .उत्तर महाराष्ट्रही मी फिरलो आहे .मी फिरलो नसतो तर शिवसेना वाढली नसती असा टोलाही त्यांनी विरोधकांना लावला आहे .

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात का जात नाहीत? असा आरोप ही विरोधकांनी त्यांच्यावर लावला आहे .तुम्ही मंत्रालयात कधी जाणार ?असा सवाल संजय राऊत यांनी विचारला असता याच कारण मी स्वतःच स्वतःवर बंधन घालतो आहे . मी जनतेला ‘हे करू नका, ‘ते करू नका ‘ सांगतो आहे आणि मीच फिरतोय हे काही योग्य नव्हे ,मी कुठेही जाण म्हणजे गर्दी होणं अस त्यांनी सांगितले .एका ठिकाणी जाऊन बसणे म्हणजे सर्व काही नव्हे .तुम्ही मंत्रालयात जाऊन बसला आणि केलं काहीच नाही तर मंत्रालयात जाण्याचा काहीच उपयोग नाही .काही न करता फिरणं आणि न फिरता बरच काही करणं यात फरक आहे असेही ते म्हणाले