मुख्यमंत्री आज 1 वाजता साधणार जनतेशी संवाद, काय असतील नवीन नियम?

9

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (रविवार) दुपारी 1 वाजता पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते कोरोनाचा धोका, मेट्रो कारशेड आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून होणारे आरोप या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला संबोधणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकल ट्रेनबाबत काही महत्त्वाची घोषणा करणार का? याबाबत जनतेला प्रश्न पडले आहेत. तसेच नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काही नव्या नियमावली जाहीर करणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे. एकीकडे कोरोनाचा धोका वाढत आहे आणि दुसरीकडे राजकीय वर्तुळात खळबळ असल्याचं पाहायला मिळतं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंबली आहे त्यामुळे या सगळ्यावरून काही मोठा निर्णय घेतला जाणार आहे का हे पाहणं आता जनतेसाठी महत्त्वाचं असणार आहे.

राज्यात शनिवारी 74 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 3 हजार 940 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 119 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा काही गोष्टींवर निर्बंध घालणा आहेत का हे जाणणे देखील महत्तवाचे आहे.