हैद्राबाद निकालाच्या घवघवीत यशानंतर राम कदम यांनी काही ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवाच फडकावणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच शिवसेनेच्या ३० वर्षांच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईतील नागरिक त्रस्त झाले आहेत. अशी टीकाही त्यांनी केली आहे. हैद्राबाद निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण १५० जागांच्या महापालिकेत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे .
तसेच राम कदम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर राहुल गांधी यांच्यावर टीका केलेली आहे. कोरोना काळात प्रशासनाकडून जी बेपरवाई केली गेली आहे, ती नागरिक अजूनही विसरलेले नाहीत. अशी टीकाही राम कदम यांनी शिवसेनेवर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला बिहारमध्ये यश मिळाले आहे. हैद्राबादमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई BMC वर भारतीय जनता पक्षाचा झेंडा पडकवणारच असा विश्वास राम कदम यांनी व्यक्त केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.