केंद्र सरकारने पेट्रोल दरवाढी पाठोपाठ खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढवल्या आहेत. शेतक-यांसाठी ही बाब म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. अगोदरच कोविड १९ च्या महामारीच्या काळात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पेरणी जवळ आली असता केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत केलेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतक-यांचे कंबरडे मोडणार आहे.
या भाववाढीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी २० मे रोजी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रहारतर्फे ताली- थाली बजाव आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
या घोषणेला प्रतिसाद म्हणून सर्व प्रहार पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपआपल्या गावात वयक्तिक स्तरावर फक्त 5 जण एकत्र येऊन, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ताली-झाली बजाव आंदोलन करावे असे आवाहन प्रहार पक्षाच्या वतीने केले आहे.