संकटांचे ढग : पुण्यात आता स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक

11

जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर राज्यासह देश संकटात आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. अंत्यविधी करण्यासाठी आता स्मशानभूमीची कमतरता जाणवत आहे. सोबतच शववाहिका आणि अँब्युलन्सचा देखील तुटवडा जाणवत आहे.

पुण्यात आता मृतदेह वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिका कमी पडत असल्याने स्कूल बसची मदत घेण्यात येणार आहे. दहा स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्याची परवानगी महापालिकेने आरटीओकडे मागितली होती. त्याला आता आरटीओ कडून मंजुरी देण्यात आली आहे.

प्रत्येक स्कूल बसचं भाडं प्रतिदिन 1600 रुपये असणार आहे. त्यामुळे आता दहा स्कूल बसमधून पुण्यात मृतदेहांची वाहतूक करण्यात येईल. धक्कादायक असलं तरी हे पुण्यातील वास्तव आहे. रुग्णांना वाढता मृत्युदर चिंतेचा विषय ठरत आहे.

रुग्णवाहिका कमी पडू लागल्याने महापालिका यांत्रणेपुढे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे महानगरपालिकेने बसेसच्या माध्यमातून मृतदेह वाहतुकीचा निर्णय घेतला आहे.