मुंबईत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. आज सायंकाळी ८ :०० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील वाढता कोरोना संसर्ग, लादण्यात आलेला लॉकडाऊन, कोरोना लसीकरण या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्वपूर्ण घोषणा करणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे शासनाच्या उपाययोजनाही कोरोनाची साखळी तोडण्यात तोकड्या पडत असल्याचं चित्र निर्माण झाल आहे. राज्यातील वाढत्या कोरोनामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे देशभरात उद्यापासून १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे.
तसेच उद्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय संवाद साधणार तसेच विरोधकांच्या टीकेवर काय उत्तर देणार याकडे सर्व जनतेचे तसेच विरोधकांचे सुद्धा लक्ष लागून राहिले आहे.