सध्या राजकीय वर्तुळात कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, सुरू असलेल्या वादातून चर्चा करून मार्ग सोडवण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना केले आहे. केवळ एका लाईनसाठी मेट्रो कारशेड कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एकमेकांच्या आडवं येण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढू आणि त्याचे श्रेय विरोधकांना देण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.आरेमधील जंगल राज्य सरकारने वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी, एकत्र मिळून कांजूरच्या जागेचा वादा सोडवावा, असे विरोधकांना आवाहन करत त्यांना श्रेय द्यायला तयार आहोत असे वक्तव्य केले.
तसेच त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले. मी माझ्या मुंबईसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी अहंकारी आहे. केंद्राने आणि राज्याने एकत्र बसून जागेचा वाद सोडवला पाहिजे.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आज जनतेला संबोधित केले. दरम्यान, त्यांनी राज्यात सुरू असेले मेट्रो कारशेड वादावर भाष्य करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.