महाराष्ट्रातील जनतेने यंदाच्या वर्षी कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळी घेण्याचा संकल्प नवीन वर्षात करुयात असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यांनी पत्राद्वारे केलं आहे.
गेल्या वर्षभरात संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकसहभागामुळे अतिशय जबाबदार पद्धतीने कोरोनाची लढाई लढली आहे. आज आपण अनेक मार्गांनी कोरोना काहीशा प्रमाणात कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.
सध्याच्या आव्हानात्मक परिस्थीचा अतिशय जिद्धीने सामना करती असलेल्या डॉक्टर, परिचारीका, पोलीस, शासकीय आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तसेच स्वयंसेवकांना नव वर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा, असं लिहून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
या पत्रात मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत कोरोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र राज्यानं कसा लढला आणि नवीन वर्षामधील परिस्थिती संदर्भातही पत्रात लिहिलं आहे.